“How to Change Name on 7/12? Fast & Easy Guide (Updated)”

     **      7/12 वरील नाव दुरुस्ती प्रक्रिया – संपूर्ण मार्गदर्शक     **      

परिचय (Introduction):

7/12 उताऱ्यात (अधिकार अभिलेखात) नाव चुकीचे असल्यास किंवा वारसाहक्कामुळे बदलायचे असल्यास नाव दुरुस्ती करावी लागते. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. या लेखात नाव दुरुस्ती प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

**    नाव दुरुस्ती का करावी लागते किंवा नाव दुरुस्ती करण्याचे कारणे

     कोणती ?

  1. महिलांच्या बाबतीत 7/12 उतार्यावर लग्नापूर्वीचे नाव असते आणि आधार कार्ड वर लग्नाच्या नंतरचे नाव असते त्यावेळी  
  2. बऱ्याच वेळा 7/12 उतार्यावर वर उपनाव लावलेले असतात जसे की ‘राव’,बाई,ताई असे बाबु (बाबुराव)
  3. 7/12 उतार्यावर दोन आडनावे लावलेली असतात तेव्हा जसे की शिंदे (पाटील)
  4. हस्तलिखित 7/12 उतार्यावर नाव बरोबर आहे,परंतु online 7/12 वर नाव चुकीच असेल तेव्हा

**    नाव दुरुस्ती करणे का गरजेचे आहे**

      1) जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अडथळा येऊ नये म्हणून

      2) शासकीय योजनांमध्ये अर्ज करतेवेळी अडथळे येऊ नये यासठी

      3) शेती वर कर्ज घेण्यासठी 7/12 वरील नाव व आधार कार्ड वरील नाव सारखे असणे

        आवश्यक आहे

**     नाव दुरुस्ती कोण करू शकतो?

– मूळ जमीन मालक किंवा त्याचे वारसदार

– जमीन विकत घेतल्यानंतर नवीन मालक

– कायदेशीर अधिकार मिळवलेले व्यक्ती

**   नाव दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1. अर्जदाराचा आधारकार्ड

2. 7/12 उतारा (ज्यात चुकीच्या नावाची नोंद आहे  )

3. मालकी हक्क दर्शवणारे दस्तऐवज (उदा. खरेदीखत, वारस प्रमाणपत्र)

4. नाव दुरुस्ती राजपत्र

5) गरज असेल तर रु 100 च्या मुद्रांक शुल्क वर अर्जदाराचे शपथपत्र

**   ऑनलाईन नाव दुरुस्ती प्रक्रिया

1. महाभूलेख पोर्टलला भेट द्या – https://bhulekh.mahabhumi.gov.in

2. लॉगिन करा (जर खाते नसेल तर नवीन खाते तयार करा)

3. नाव दुरुस्ती फॉर्म निवडा

4. सर्व माहिती भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

5. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करा

6. अर्जाचा Status वेळोवेळी तपासा

**   ऑफलाईन नाव दुरुस्ती प्रक्रिया

  1. तलाठी(ग्राम महसूल अधिकारी कार्यालय) कार्यालयात भेट द्या
  2. नाव दुरुस्ती साठी अर्ज करा.अर्जावर फोटो लावा आणि सही करा
  3. अर्जासोबत राजपत्रची छायांकित प्रत आणि आधार कार्डची प्रत जोडा
  4. गरज असेल तर रु 100 च्या मुद्रांक शुल्क वर अर्जदाराचे शपथपत्र करून जोडा
राजपत्र ची प्रत

**  नाव दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ

  1. तलाठी(ग्राम महसूल अधिकारी कार्यालय) आपण भरलेल्या अर्जाची तपासणी करतात.
  2. अर्जाची तपासणी करून त्यात जर काही त्रुटी असतील तर त्याची पूर्तता करून घेतील
  3. अर्ज आणि सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर तलाठी(ग्राम महसूल अधिकारी) त्याची नोंद घेतील (फेरफार घेतील) त्याचा एक नंबर तयार होईल  व नमुना 9 ची नोटीस तयार करतील (हि नोटीस गावच्या ई चावडी वरती पण पाहता येते)
  4. नमुना 9 ची नोटीस तयार केलेल्या तारखेपासून 16 दिवसानंतर आपला फेरफार मंडळ अधिकारी यांच्या कडे मंजुरी साठी जाईल
  5. मंडळ अधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर 7/12 वर नाव दुरुस्त होईल   

     **      नाव दुरुस्ती करताना होणाऱ्या समस्या आणि उपाय

         समस्या 1: अर्ज मंजूर होण्यास वेळ लागतो.

         ➡ उपाय: अर्ज क्रमांक वापरून तलाठी(ग्राम महसूल अधिकारी कार्यालयता) फॉलोअप घ्या.

         समस्या 2: कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळतात.

         ➡ उपाय: सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज सबमिट करा.

         समस्या 3: ऑनलाईन सिस्टममध्ये अडथळे येतात.

         ➡ उपाय: नजीकच्या सेतू केंद्रावर जाऊन अर्ज भरा.

     **       नाव दुरुस्तीची फी (Charges)

         ऑनलाईन अर्ज शुल्क: ₹100 – ₹500 (परिस्थितीनुसार)

         ऑफलाईन प्रक्रिया शुल्क: स्थानिक महसूल विभागाच्या नियमानुसार

     **      टीप      **      

7/12 वर नाव दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे, विशेषतः वारसा हक्क आणि जमिनीच्या व्यवहारांसाठी. योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास प्रक्रिया जलद पूर्ण होते. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि वेळ वाचवणारी आहे.

1 thought on ““How to Change Name on 7/12? Fast & Easy Guide (Updated)””

Leave a Comment