“Agri Stack Explained: Everything Farmers Need to Know!”

  • Agri Stack ची योजना नेमकी काय आहे.

 

    Unique Farmer ID (यूनीक शेतकरी ओळख) –ज्या प्रमाणे भारतातील प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र विशिष्ट ओळख असेलेला आधार नंबर असतो त्याप्रमणे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या आधार आणि जमीन मालकीच्या माहितीच्या आधारे एक विशेष ओळख क्रमांक दिला जातो.

    डिजिटल लँड रेकॉर्ड (जमिनीची डिजिटल नोंद) –या योजनेमध्ये  ७/१२ उतारा, ८अ उतारा, भौगोलिक माहिती, आणि जमिनीचे मॅपिंग समाविष्ट आहे.

    कृषी डेटा (Agricultural Data) – हवामान, जमिनीचा प्रकार, मृदा आरोग्य, सिंचन व्यवस्था यांचा समावेश असतो.

    ई-मार्केटिंग आणि ई-कॉमर्स (E-Market & E-Commerce) – शेतकऱ्यांना थेट बाजारपेठांशी जोडण्यासाठी ऑनलाइन विक्रीचे पर्याय दिले जातात.

    सरकारी योजना आणि अनुदान (Schemes & Subsidies) – आज पर्यंत शेतकरी यांना अनुदान किंवा सरकारी योजने साठी बँक खाते वगैरे तलाठी ऑफिस ला जमा करावे लागत होते. आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो.

    Smart Advisory Services (स्मार्ट सल्ला सेवा) – हवामान अंदाज, पिकांची माहिती, खत व्यवस्थापन, आणि सुधारित तंत्रज्ञान यासंबंधी मार्गदर्शन मिळते.

    Agri Stack या योजनेचा फायदा :

    शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळतो.
    पीक उत्पादन आणि विक्री प्रक्रिया सुलभ होते.
    हवामान आणि मृदा माहितीच्या आधारे योग्य शेती सल्ला मिळतो.
    जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात असल्याने व्यवहार सुलभ होतात.

    Agri Stack मध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख संस्था:

    भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR)

    नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC)

    इस्रो (ISRO) आणि रिमोट सेन्सिंग डेटा

    राज्य सरकारे आणि कृषी विभाग