ई-पिक पाहणी मोबाईलवर कशी करावी?

ई-पिक पाहणी मोबाईलवर कशी करावी?

शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणी ॲपचा वापर करून आपली पिके नोंदवणे हे सोपे आणि सोयीचे झाले आहे. खालील चरणांद्वारे आपण ई-पिक पाहणी ॲपचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.


  1. ॲप डाउनलोड करा

आपल्या मोबाईलच्या Play Store मध्ये जाऊन ई-पिक पाहणी (E-Pik Pahani) हे ॲप शोधा व डाउनलोड करा.

जर ॲप आधीपासून इंस्टॉल असेल तर ते अपडेट करून घ्या.


  1. ॲपमध्ये लॉगिन करा

ॲप उघडल्यानंतर तुमच्या विभागाचे नाव (उदा. अमरावती, छत्रपती संभाजीनगर इ.) निवडा.

नंतर लॉगिन पद्धत निवडताना “शेतकरी म्हणून लॉगिन करा” हा पर्याय निवडा.

तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) टाका.


  1. खातेदार निवडा

खातेदाराचे नाव असा पर्याय दिसेल.

जर तुमचे नाव आधीपासून नोंदणीकृत असेल तर ते निवडा.

अन्यथा “नवीन खातेदार नोंदणी करा” हा पर्याय निवडा.


  1. क्षेत्र आणि खातेदाराची माहिती भरा

विभाग (उदा. अमरावती, छत्रपती संभाजीनगर)

जिल्हा

तालुका

गाव

खातेदार शोधताना नाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक यापैकी पर्याय वापरून शोधा.

नंतर तुम्हाला एक सांकेतिक क्रमांक (Code) मिळेल.

तो सांकेतिक क्रमांक सुरक्षित ठेवावा.


  1. पिक माहिती भरा

होम स्क्रीनवर जाऊन “पिक माहिती नोंदवा” हा पर्याय निवडा.

खालील माहिती भरावी:

खाते क्रमांक

गट क्रमांक

हंगाम (रब्बी, खरीप, संपूर्ण वर्ष)

पिकाचा वर्ग (निर्भेळ पिक, मिश्र पिक)

पिकाचा प्रकार (पिक, फळबाग)

पिकाचे नाव

क्षेत्र (एकर किंवा हेक्टरमध्ये)

जलसिंचनाचे साधन

सिंचन पद्धत

लागवडीचा दिनांक


  1. पिकाचा फोटो अपलोड करा

शेवटच्या टप्प्यात तुमच्या पिकाचे अक्षांश आणि रेखांश अद्ययावत करा.

पिकाचा फोटो काढा व अपलोड करा.

Leave a Comment